कलियुगात विज्ञानाचा उपयोग साधनेसाठी केल्यास याच जन्मात मनुष्यजन्माचे सार्थक होण्यास साहाय्य होणे
‘यापूर्वीच्या युगांमध्ये मनुष्याचे आयुष्यमान अधिक होते आणि त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवरील क्षमता अतिशय चांगली होती. त्यामुळे त्या काळानुसार ध्यान, समाधी, यज्ञ यांसारख्या साधना केल्या जात होत्या. आता कलियुगामध्ये मनुष्याचे आयुष्यमान आणि सर्वच स्तरांवरील क्षमता न्यून झाली आहे. या परिस्थितीत साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठीच विज्ञानाचे साहाय्य घेतल्यास ते सहज साध्य होऊ शकते, उदा. काळानुसार एकाग्रतेने नामजप करणे शक्य नसते, अशा वेळी ध्वनीमुद्रित नामजप भ्रमणभाषसारख्या यंत्राच्या माध्यमातून सतत लावून ठेवला की, त्याची जाणीव होऊन नामजपाची गोडी निर्माण होते. संगणक आणि भ्रमणभाष यांवर आपल्या इष्टदेवतेचे चित्र ठेवले की, भावजागृतीसाठी साहाय्य होते. संकेतस्थळ आणि भ्रमणभाष यांच्या माध्यमातून अनेकांपर्यंत साधनेचा विषय पोचवता येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.९.२०२१)