५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. नैवेद्या अनंत देव (वय १ वर्ष ९ मास) !
५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तळेगाव, दाभाडे (जि. पुणे) येथील चि. नैवेद्या अनंत देव (वय १ वर्ष ९ मास) हिची तिचे वडील आणि आजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् अनुभूती येथे दिल्या आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. श्री. अनंत किशोर देव (नैवेद्याचे वडील)
१ अ. शांत स्वभाव
१. ‘नैवेद्याचा जन्म झाला, तेव्हा रुग्णालयात ती अजिबात रडली नाही. ती शांत असायची.
२. सद्गुरु जाधवकाकांचा (सद्गुरु नंदकुमार जाधव) सत्संग चालू असतांना नैवेद्या सद्गुरु काकांच्याकडे बघून हसायची. तिने आम्हाला सद्गुरु काकांचा संपूर्ण सत्संग शांतपणे बघू दिला.
१ आ. श्लोक आणि रामरक्षा ऐकायला आवडणे
१ आ १. आजी श्लोक म्हणत असतांना तिच्याकडे बघत श्लोक ऐकणे आणि श्लोकातील दोन शब्द उच्चारणे : माझी आई ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा..।’ हा श्लोक म्हणते. नैवेद्या आजीकडे बघत हा श्लोक ऐकते. ती २ मासांची असतांना एकदा माझ्या आईने श्लोक म्हटल्यावर नैवेद्याने श्लोकातील ‘योग तुझा’ हे दोन शब्द उच्चारले.
१ आ २. अंघोळ करतांना किंवा जेवतांना श्लोक ऐकायला आवडणे : नैवेद्या अंघोळ करतांना, जेवतांना आणि झोपतांना आम्ही म्हणत असलेले श्लोक ऐकते.
१ आ ३. प्रतिदिन शांतपणे रामरक्षा ऐकणे : माझी आई प्रतिदिन नैवेद्याला घेऊन रामरक्षा म्हणते. रामरक्षा पूर्ण होईपर्यंत नैवेद्या ती शांतपणे ऐकते आणि विठ्ठल, विठ्ठल म्हटले की, टाळ्या वाजवते.
१ इ. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र आणि देवतांची चित्रे ओळखणे : नैवेद्याला देवघराजवळ घेऊन बसल्यावर मी एकदा तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि अंबाबाई, श्रीकृष्ण आदी देवतांची चित्रे दाखवली. त्यानंतर प्रतिदिन तिला देवतेचे नाव घेऊन ‘ही देवता कुठे आहे ?’, असे विचारले की, ती लगेच त्या देवतेकडे बघते.’
२. श्रीमती शैला देव (नैवेद्याची आजी)
२ अ. सात्त्विकतेची आवड
२ अ १. सात्त्विक खेळणी आवडणे : ‘नैवेद्याला सात्त्विक खेळणी आवडतात. तिच्या खेळण्यांत १ कासव आहे. ती बराच वेळ त्या कासवाशी खेळते. तिच्या खेळण्यांमध्ये पाश्चात्त्य वेशभूषा असलेली बाहुली आहे. ती तिच्याशी खेळत नाही. एकदा नैवेद्याला ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार..’, हे गाणे म्हणणार्या लहान मुलाचे खेळणे खेळायला दिल्यावर तिने ते खेळणे फेकून दिले.
२ अ २. देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांच्याकडे पाहून आनंद होणे : नैवेद्याला देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांच्याकडे पाहून पुष्कळ आनंद होतो. चित्रे पाहून ती निरनिराळे हावभाव करते.
२ अ ३. नैवेद्या रात्री उशिरा झोपूनही पहाटे ५ वाजता उठते. तेव्हा तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ सात्त्विकता जाणवते.’
३. अनुभूती
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या नैवेद्याच्या संदर्भातील अनुभूती
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ आम्ही नैवेद्याच्या जवळ ठेवल्यावर ती ते दैनिक जवळ घेते आणि परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून हसते.
२. परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ नैवेद्याच्या डोक्याखाली ठेवल्यावर ती शांतपणे झोपते. कधीकधी ती झोपेत हसते.
३. नैवेद्या समोर असतांना परात्पर गुरुदेवांचे नाव घेतल्यावर ती लगेच त्यांच्या छायाचित्राकडे बघते आणि आवाज देते.
४. एकदा मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना नैवेद्या माझ्याजवळ होती. त्या वेळी मी जितका वेळ साप्ताहिक वाचत होतो, तितका वेळ ती साप्ताहिकातील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहात होती.’
– श्री. अनंत किशोर देव (नैवेद्याचे वडील)
५. ‘एकदा नैवेद्या झोपत नव्हती. त्या वेळी मी तिला म्हणाले, ‘‘परात्पर गुरुदेवांनी तुला काय सांगितले आहे ? नामजप करायचा आणि लवकर झोपून लवकर उठायचे.’’ तेव्हा तिने लगेच डोळे मिटले अन् ती झोपली. एरव्ही ती मध्यरात्री १.३० ते २ वाजेपर्यंत झोपत नाही.’ – श्रीमती शैला देव (नैवेद्याची आजी)
३ आ. नैवेद्याच्या संदर्भात नातेवाईकांना आलेल्या अनुभूती
३ आ १. नैवेद्यामुळे चिडचिड न्यून होणे : ‘नैवेद्याच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर पुष्कळ शांत वाटते. नैवेद्यामुळे आता माझी चिडचिड होत नाही.
३ आ २. नैवेद्याच्या सहवासात गुरुस्मरण चांगले होणे : नैवेद्याच्या सहवासात असतांना किंवा तिला झोपवत असतांना माझे गुरुस्मरण चांगले होते. ‘नैवेद्या समवेत असतांना मला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवले.
३ आ ३. नैवेद्याची दृष्ट काढतांना ‘मारुतिराया तिच्याशी बोलत आहे’, असे वाटणे : मी मारुतीला प्रार्थना करून नैवेद्याची दृष्ट काढते. तेव्हा मला तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य जाणवते. तसेच ‘साक्षात् मारुतिराया तिच्याशी बोलत आहे’, असे वाटते.
३ आ ४. नैवेद्याचा जन्म झाल्यापासून मनातील भीती न्यून होणे : पूर्वी मला घरी एकटे रहाण्याची आणि बाहेर एकटे जाण्याची भीती वाटत असे. तसेच रुग्णवाहिकेचा आवाज ऐकल्यावर किंवा एखाद्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर माझ्या हृदयाचे ठोके वाढून मला पुष्कळ भीती वाटत असे. नैवेद्याचा जन्म झाल्यापासून माझी ८० टक्के भीती न्यून झाली आहे. माझ्यातील धीटपणा वाढला आहे. आता मी एकटी बाहेर जाऊ शकते.
३ आ ५. नैवेद्याचा तोंडवळा पाहिल्यावर भाचीच्या मनावरील ताण न्यून होणे : माझ्या भाचीने मला सांगितले, ‘‘नैवेद्याचा तोंडवळा पाहिल्यावर माझ्या मनावरील ताण न्यून होतो.’’ त्यामुळे मी भ्रमणध्वनीवर पुष्कळ वेळा तिचे छायाचित्र पहाते.’
– श्रीमती शैला देव (नैवेद्याची आजी), तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे.
३ आ ६. नैवेद्याला पाहिल्यावर मला तिच्या तोंडवळ्यावर चैतन्य जाणवते.
३ आ ७. नैवेद्याच्या पायात तोरड्या (पैंजण) घातल्यावर तिचे पाय मला अंबाबाईच्या पायांसारखे दिसले.’
– कु. नलिन श्रेय टोंपे (वय १० वर्षे) (नैवेद्याचा आतेभाऊ), तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे.
(या लेखातील सर्व सूत्रांसाठी दिनांक २.१२.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |