मतदारसूचीतील अनुमाने ३ लाख मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसूची अद्ययावत करतांना उघड झालेली माहिती !
पुणे – पुढील वर्षात पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका यांच्या निवडणुका होणे अपेक्षित असल्याने जिल्हा निवडणूक शाखेने मतदारसूची अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भाग येथील जवळपास ३ लाख मतदारांचे छायाचित्र नसल्याचे उघडकीस आले आहे. (निवडणुका आल्यानंतर मतदारसूची अंतिम करणारे प्रशासन नको, तर त्याआधीच सूची अंतिम करणारे प्रशासन हवे ! – संपादक) मतदारसूचीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना छायाचित्र देण्याचे आवाहन करण्यासमवेतच छायाचित्र न दिल्यास मतदारसूचीतून मतदारांचे नाव वगळण्याची चेतावणी देण्यात आली आहे.