पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस !
भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी ! – संपादक
पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १५ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली असून २९ सप्टेंबरपर्यंत कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे, अशी माहिती अन्वेषण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांनी दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह ५ जण लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. याच प्रकरणातील ध्वनीचकती पुढे आली असून त्यासंदर्भात १५ सदस्यांची चौकशी होणार असल्याचे समजते.