शेतकर्याकडून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषाच्या अधिकार्यासह दोघे अटकेत !
पुणे, २४ सप्टेंबर – पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकर्याकडे ५ सहस्र रुपयांची लाच मागणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषाचे (पीडीसीसी) विकास अधिकारी दीपक सायकर आणि वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव गोपीचंद इंगळे यांना २२ सप्टेंबर या दिवशी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणी एका ३३ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून प्रकरणाची पडताळणी करून सापळा रचून रक्कम स्वीकारतांना त्यांना कह्यात घेण्यात आले. (मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची मानसिकता नष्ट करण्यासाठी लाच घेणार्यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे ! – संपादक)