भाववृद्धी सत्संगात पितृपक्षानिमित्त माहिती मिळाल्याने महालय श्राद्धाच्या दिवशी आलेली अनुभूती
१. ‘श्राद्धविधी चालू असतांना पूर्वज घरी आले आहेत आणि विधी झाल्यावर ते अन्न ग्रहण करून गेले’, असे जाणवणे
‘भाववृद्धी सत्संगात पितृपक्षानिमित्त माहिती मिळाली आणि त्याचे महत्त्व मनावर बिंबले गेले. १०.९.२०२० या श्राद्धाच्या दिवशी मला सकाळपासूनच पुष्कळ उत्साह जाणवत होता. माझा दत्ताचा नामजप चालू होता. ‘आज आपल्याकडे देव आणि पूर्वज जेवायला येणार आहेत’, या भावाने मन आनंदी झाले होते. स्वयंपाक करतांना माझ्याकडून दत्त आणि पूर्वज यांना सतत प्रार्थना होत होती. ‘कोरोना महामारीच्या काळातही गुरूंच्या कृपेने पुरोहितांना बोलावून हिरण्यश्राद्ध करता आले’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘श्राद्धविधी चालू असतांना पूर्वज घरी आले आहेत आणि विधी झाल्यावर ते अन्न ग्रहण करून गेले’, असे मला जाणवले.
२. सकाळी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या प्रतिमेला वाहिलेला मोगर्याचा गजरा रात्रीपर्यंत तसाच पूर्णपणे टवटवीत रहाणे
सकाळी देवपूजा झाल्यावर मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या प्रतिमेला मोगर्याचा गजरा वाहिला होता. तो गजरा रात्रीही तसाच पूर्णपणे टवटवीत होता; मात्र तेथेच बाजूला ठेवलेला गजरा पूर्ण वाळला होता. त्या वेळी माझा पुष्कळ भाव जागृत झाला. ‘गुरुमाऊलीची माझ्यावर किती कृपा आहे !’, या जाणिवेने माझे मन भरून आले.
एवढी सुंदर अनुभूती दिल्याबद्दल श्री गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सोनाली अंबुलकर, नर्हे, पुणे. (सप्टेंबर २०२०)