महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआय करणार
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे अन्वेषण आता केंद्रीय अन्वेषण विभागाला (‘सीबीआय’ला) सोपवण्यात आले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात एक गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ६ सदस्यीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाकडून या प्रकरणाची अन्वेषण केले जात होते; मात्र काही संत आणि महंत यांच्याकडून या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआकडून करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
CBI takes over probe into Mahant Narendra Giri’s death https://t.co/T2f0skEjsY
— The Times Of India (@timesofindia) September 24, 2021