५ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा शासनाधीन !
सातारा, २३ सप्टेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील आसवळी आणि पळशी येथ राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ४ लाख ९३ सहस्र ८८० रुपयांचा अवैध मद्यसाठा शासनाधीन केला आहे. या प्रकरणी अवैध हातभट्टी मद्यविक्री आणि वाहतूकप्रकरणी ४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. २ चारचाकी वाहने आणि ७३० लिटर हातभट्टी मद्यसाठा शासनाधीन करण्यात आला आहे.