परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या लेखाचा मथळा त्याअंतर्गत येणार्या लिखाणाला सुसंगत नसण्याच्या संदर्भातील चुका
‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
लेखाचा मथळा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. मथळा वाचूनच पुढील लेख वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतील लेखांच्या मथळ्यांमध्ये एक वेगळेपण आहे. आकर्षक होण्यासाठी रूपकात्मक, प्रश्नात्मक, एका शब्दातील मथळा देण्याऐवजी मथळा लिखाणाचा आशय वाचकाला स्पष्ट करणारा असावा, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आहे. मुख्य मथळ्यासह लेखाच्या अंतर्गत लिखाणातही विषयानुसार सूत्रे करून त्यांना उपमथळे दिल्यास त्या सूत्रात कोणते लिखाण आहे, हे वाचकांना सहज समजते. त्यामुळे सनातनच्या लेखनशैलीत असे लेखांतर्गत उपमथळे आवर्जुन वाचायला मिळतात.
‘गुरु, संत, अध्यात्मातील उन्नत, मान्यवर व्यक्ती, यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे नाव मथळ्यात असावे’, ‘घटना कुठे घडली, त्या गावाचा / शहराचा उल्लेख असेल, तर त्या प्रांतातील वाचकांचे लक्ष त्या लिखाणाकडे पटकन वेधले जाते’, असे अनेक बारकावे त्यांनीच आम्हाला शिकवले.
लिखाणाला योग्य मथळे न देण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका येथे उदाहरणादाखल देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513396.html
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह. (२२.९.२०२१)