६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी आश्रमातील श्रीमती उषा मोहे यांना नामजप ऐकू येण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. नवग्रह मंत्राचे पठण करतांना मंत्राची स्पंदने अनाहतचक्र ते स्वाधिष्ठानचक्रापर्यंत जाणवणे
‘३०.११.२०२० या दिवशी मी सकाळी नवग्रह मंत्राचे पठण करत होते. तेव्हा तो मंत्र मला माझे अनाहतचक्र ते स्वाधिष्ठानचक्रापर्यंत ऐकू येत होता. ती स्पंदने मला ३० मिनिटे जाणवत होती.
२. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप २-३ मिनिटे प्रसाधनगृहाच्या बाहेर ऐकू येणे
५.१२.२०२० या दिवशी मी एक वस्तू प्रसाधनगृहाच्या बाहेरील नळावर विसरले होते. मी ती वस्तू आणण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजता तेथे गेल्यावर मला स्पष्टपणे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप २ – ३ मिनिटे ऐकू येत होता. त्या वेळी प्रसाधनगृहात कुणीही नव्हते.
‘प.पू. गुरुदेव, तुमच्या कृपेमुळेच मला या अनुभूती आल्या. त्यासाठी मी तुमच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती उषा मोहे (वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |