राजकीय पक्ष आणि सनातन संस्था यांमधील भेद
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने त्याच्या कार्यकर्त्यांना काही काम सांगितल्यावर ‘ते कार्य करतील कि नाही ?’, याची त्यांना निश्चिती नसते. त्यांच्याकडून काम करवून घेण्यासाठी त्यांना त्या कार्यकर्त्यांना काही तरी द्यावे लागते. याउलट सनातन संस्थेमध्ये कार्यकर्ते नसून साधक असल्यामुळे ते प्रत्येक कार्य ‘सेवा’ म्हणून करतात. त्यामुळे ते स्वतःहून पुढाकार घेऊन कार्य करतात. त्यामुळे सनातनला साधकांच्या संदर्भात वरील प्रमाणे शंका कधीच येत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले