वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात बलात्काराच्या २ सहस्र ६१ घटना उघडकीस !
बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानी !
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला हे लज्जास्पद ! – संपादक
- बलात्काराच्या वाढत्या घटना हे समाजाच्या अध:पतनाचे लक्षण आहे ! महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याविना पर्याय नाही ! – संपादक
मुंबई – ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या वर्ष २०२० च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बलात्काराच्या २ सहस्र ६१ घटना घडल्या. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ ही केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था असून प्रतिवर्षी या संस्थेकडून देशातील गुन्हेगारीची आकडेवारी घोषित केली जाते. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र बलात्काराच्या घटनांमध्ये देशात चौथ्या स्थानी, तर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दहाव्या स्थानी आहे.
बलात्काराच्या घटनांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर असून तेथे वर्ष २०२० मध्ये बलात्काराच्या ५ सहस्र ३१० घटना घडल्या. उत्तरप्रदेश दुसर्या क्रमांकावर असून तेथे २ सहस्र ७६९ घटना घडल्या, तर बलात्काराच्या २ सहस्र ३३९ घटना घडलेला मध्यप्रदेश तिसर्या क्रमांकावर आहे. वर्ष २०२० मध्ये देशात बलात्कार करून हत्या झाल्याच्या २१९ घटना घडल्या. त्यातील २० घटना महाराष्ट्रातील आहेत. हुंडाबळीच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा ९ वा क्रमांक आहे. या संस्थेच्या आकडेवारीनुसार एकूण गुन्हेगारी घटनांमध्ये महाराष्ट्र देशात २३ व्या क्रमांकावर आहे.
वर्ष २०१८ च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या ३५ सहस्र ४९७, वर्ष २०१९ मध्ये ३७ सहस्र १४४, तर वर्ष २०२० मध्ये ३१ सहस्र ९५४ घटना घडल्या.