पसार झालेल्या धर्मांध आरोपीस मुंब्रा येथून अटक !
-
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !
-
आरोपीला पकडण्यासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित
मुंब्रा (ठाणे), २३ सप्टेंबर (वार्ता.) – उत्तर दशेच्या लखनऊ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद असलेला; पण पसार असलेला आरोपी अब्दुल रज्जाक अब्दुल नबी मेमन (वय ४० वर्षे) याला महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकांनी २२ सप्टेंबरला मुंब्रा परिसरातून अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले होते.
Maharashtra ATS arrested one Abdul Razaq Memon from Mumbra, Thane at the request of the UP ATS chief. Abdul was having a reward of Rs 1 lakh on his head & UP ATS had issued a look-out notice against him in connection with a case registered in Lucknow. pic.twitter.com/KREW6SI1do
— ANI (@ANI) September 22, 2021
तो मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागातील रोशनी महल येथील घरात वास्तव्यास आहे, अशी माहिती उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर धाड टाकल्यावर मेमन पोटमाळ्यावर लपून बसलेला सापडला. त्याला उत्तरप्रदेश येथे नेण्याची न्यायालयीन प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. (विविध गुन्ह्यांतील आरोपींना आश्रय घेण्यासाठी मुसलमानबहुल वस्ती असलेले मुंब्रा शहर सुरक्षित वाटते. अशांना आश्रय देणार्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला हवी. – संपादक)