मारुति मंदिरावरील ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे ‘हनुमान चालिसा’चे प्रसारण !
पाळधी (जिल्हा जळगाव) येथील श्रीरामचंद्र संघटनेचा उपक्रम !
जळगाव, २३ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पाळधी येथील हिंदुत्वनिष्ठ श्रीरामचंद्र संघटनेच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात. संघटनेने मारुति मंदिरावर ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवून प्रतिदिन ‘हनुमान चालिसा’चे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. (अन्य गावांतील हिंदूंनी यातून बोध घ्यावा ! – संपादक)