बारामती येथील गोवंशियांना टेम्पोत भरून हत्येसाठी नेणार्या २ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !
वारंवार घडणार्या गोवंशियांच्या कत्तलीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांना कायमची जरब बसेल अशी दहशत पोलिसांनी निर्माण करायला हवी, तरच अशा घटनांना आळा बसेल ! – संपादक
बारामती (पुणे), २३ सप्टेंबर – येथील निरावागज येथून टेम्पोत भरून उस्मानाबाद येथे हत्येसाठी नेण्यात येणार्या जनावरांची १९ सप्टेंबर या दिवशी गोरक्षक आणि व्यसनमुक्तीचे कार्य करणारे युवक यांनी सुटका केली. या युवकांनी या घटनेची माहिती पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना दिली. त्यांनी पोलिसांना संपर्क केल्याने टेम्पोसह ही जनावरे बारामती तालुक्यातील पोलिसांनी कह्यात घेतली आणि उंडवडी कडेपठार येथील गोशाळेत जनावरांना सुखरूप पोचवण्यात आले. या प्रकरणी टेम्पोचालक हाजी शेख आणि टेम्पोमालक जाबीर कुरेशी या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. यासंबंधी ऋषिकेश देवकाते यांनी तक्रार दिली.
बारामती तालुक्यातील निरावागज, सोनगाव, डोर्लेवाडी, मळद आदी भागांतून जनावरे कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता शिवशंकर स्वामी यांनी व्यक्त केली. (गोरक्षकांना ‘बंदोबस्त करा’, हे पोलिसांना का सांगावे लागते ? पोलिसांनी स्वत:हून करणे अपेक्षित आहे ! – संपादक)