५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. त्र्यंबक संग्राम घोलपे (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. त्र्यंबक संग्राम घोलपे हा एक आहे !
चि. त्र्यंबक संग्राम घोलपे आज भाद्रपद कृष्ण पक्ष तृतीया (संकष्टी चतुर्थी) २४.९.२०२१ या दिवशी कोल्हापूर येथील चि. त्र्यंबक संग्राम घोलपे याचा तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई सौ. प्रियांका घोलपे यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. त्र्यंबक संग्राम घोलपे याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक आशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भधारणेपूर्वी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना
अ. ‘मी १८.१.२०१८ या दिवशी माहेरी गेले होते. तेव्हा एका साधकाकडे साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेऊन आल्यावर आम्हा सुवासिनींना ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला बोलावले होते. या वेळी त्यांनी मला माहूरगडाच्या रेणुकादेवीचा प्रसाद म्हणून तांबूलविडा दिला आणि म्हणाल्या, ‘‘या प्रसादाने लवकर गोड बातमी मिळूदे.’’
आ. २६.१.२०१८ या दिवशी आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. तेव्हा शिर्डी येथील साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतांना तेथील पूजकाने साईबाबांच्या समाधीवरील एक लाडू प्रसाद म्हणून मला दिला.
या वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्यानंतर काही दिवसांनी मला दिवस गेल्याचे कळले आणि देवीचा अन् गुरूंचा आशीर्वाद मिळाल्याचे लक्षात येऊन कृतज्ञता व्यक्त झाली.
२. गर्भधारणेनंतर
अ. माझ्यावर पुष्कळ त्रासदायक आवरण आल्यामुळे मला काही सुचत नव्हते. यजमान मला रामरक्षा ऐकण्यास आणि नामजप करण्यास सांगत होते, तरी मला ‘तो करावा’, असे वाटत नव्हते. ते मला अत्तर-कापूर हातात आणून देत होते, तरी माझ्याकडून उपाय केले जात नव्हते.
आ. नंतर मी सद्गुरु स्वातीताईंना (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना) संपर्क केला आणि मला होत असलेले त्रास सांगितले. सद्गुरु ताईंनी माझ्यावर पुष्कळ त्रासदायक आवरण आल्याचे सांगितले आणि प्रयत्नपूर्वक नामजपादी उपाय करण्यास सांगितले अन् थोडी समष्टी सेवा करण्याचा प्रयत्न करण्यास सुचवले.
इ. अनुभूती
१. माझा सद्गुरु ताईंशी संपर्क झाल्यावर क्षणात मला माझ्यावरील त्रासदायक आवरण अल्प झाल्याचे जाणवले आणि ‘हे त्यांच्या वाणीतील चैतन्याने झाले आहे’, असे लक्षात आले.
२. दोन दिवसांनी मला कोल्हापूर सेवाकेंद्रात जाण्याची इच्छा झाली आणि यजमानांनी ती पूर्ण केली.
३. जन्मानंतर वय १ मास
अ. बाळाचा जन्म झाल्यावर प्रथम कृतज्ञता व्यक्त झाली. तेव्हा माझ्या समवेत कुणीही नातेवाईक नव्हते; परंतु देवाने एका साधिकेला पाठवले आणि तिने बाळाला मधातून सोने उगाळून चाटण चाटवले. ‘त्यांच्या रूपात गुरुच आले आहेत’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.
आ. बाळ ओठावर करंगळी अन् अंगठा ठेवून ‘बासरी वाजवण्याची मुद्रा करत आहे’, असे वाटत होते.
इ. तो जन्माला आला, त्याच दिवशी एका कुशीवर झाला होता. साधारण लहान बाळ तिसर्या किंवा चौथ्या मासात कुशीवर होते.
ई. बाळाचा हात मुठी आवळून नेहमी वर असायचा, ‘तेव्हा हात उंचावून तो घोषणा देत आहे’, असे वाटायचे. त्याचा हात झोपेतही पुष्कळ वेळा वरच यायचा.
उ. दसर्याच्या दिवशी बाळाचे कान टोचून नामकरण विधी केला. ‘तेव्हा त्याचे कान दुखत असतील’, असे वाटून मलाच रडायला येत होते; परंतु तो कान टोचल्यावर रडला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. नामकरण विधी करतांनाही तो न रडता पाळणा-गीत आनंदाने ऐकत होता.
४. दुसरा आणि तिसरा मास
अ. चि. त्र्यंबक अडीच मासापासून हुंकार देऊ लागला. मी त्याच्यासाठी पाळणा-गीत किंवा भक्तीगीते म्हणायचे, तेव्हा तो आनंदाने हुंकार देत प्रतिसाद द्यायचा. त्या वेळी ‘त्याला संगीताची आवड आहे’, असे वाटले.
आ. तो नेहमी हसतमुख, प्रसन्न आणि आनंदी असायचा. त्याचा हसरा तोंडवळा पाहून सर्वांना आनंद व्हायचा. त्याला उलट्या होत होत्या, तरी तो हसतमुख होता आणि त्याने जराही त्रास दिला नाही.
इ. तो प्रतिसाद देत असतांना बोलण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा त्याच्या बोलण्यातून ‘आई’, आई गं’, ‘नाही’, ‘ओ’ असे शब्द स्पष्टपणे ऐकू यायचे. आपले लक्ष नसते, ‘तेव्हा तो हाक मारल्यासारखे बोलत आहे’, असे वाटायचे. तो त्याच्या भाषेत पुष्कळ वेळ बोलून काहीतरी सांगायचा. ‘आम्ही बोललेले त्याला सर्व कळते’, असे वाटले.
ई. त्याला सूर्यप्रकाशात बसायला आवडते. तिथे तो शांत पडून रहायचा. २१.११.२०१८ या दिवशी सूर्यप्रकाशात बसवल्यावर त्याच्या कपाळावर दैवी कण (सोनेरी रंगाचे) दिसले.
उ. २०.१२.२०१८ या दिवशी मी त्याच्यासमोर ‘हिंदु-राष्ट्र जागृती सभा’ विशेषांक धरला होता. तेव्हा त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु स्वातीताईंचे छायाचित्र पाहून पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ‘तो त्यांना काहीतरी सांगत आहे’, असे वाटत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘जीवनदर्शन’ ग्रंथ हातात धरल्यावरही त्याला आनंद व्हयचा आणि तो त्यांच्याशी बोलत रहायचा.
५. चौथा आणि पाचवा मास
अ. तो आमच्याकडून कापराचे उपाय करून घ्यायचा.
आ. तो कशावरही (फर्निचर, डबा, कपाट यांवर) आनंदाने ताल धरून वाजवायचा आणि ‘आ ऽ ऽ’, असा स्वर लावून नाचायचा.
६. नववा मास ते १ वर्ष
अ. त्र्यंबकला ‘जीवन मे मेरे आपही बसे गुरुदेव’ आणि ‘गुरु शिष्य का नाता है अनमोल’ ही कृतज्ञतागीते ऐकायला आवडायची. गीते ऐकतांना गुरुदेवांचे छायाचित्र दिसल्यावर तो आनंदित व्हायचा. तो दोन वाट्या हातात धरून टाळ वाजवल्याप्रमाणे वाजवायचा.
आ. तो अकरा मासांचा असतांना काहीच खात नव्हता. तेव्हा त्याच्यासमोर सनातनची सर्व उत्पादने ठेवली आणि प्रार्थना केली, ‘बाळावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन त्याला सात्त्विक उत्पादनातील चैतन्य मिळू दे.’ त्यानंतर त्याला भरवल्यावर त्याने खाल्ले.
इ. त्याला श्रीकृष्णाच्या छायाचित्राच्या समवेत खेळायला पुष्कळ आवडते.
७. स्वभावदोष
भित्रेपणा, हट्टीपणा.’
– सौ. प्रियांका संग्राम घोलपे (बाळाची आई), कोल्हापूर (डिसेंबर २०१९)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |
दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्या या कणांचे ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात. |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |