अमेरिकेला नव्याने ‘शीतयुद्ध’ नको ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
न्यूयॉर्क (अमेरिका) – ज्यामुळे जग विभागले जाईल, अशा नव्या शीतयुद्धाच्या विचारात आम्ही नाही. शांततापूर्ण ठरावांचा पाठपुरावा करणार्या कोणत्याही देशासमवेत काम करण्यास अमेरिका सिद्ध आहे; कारण आपल्या सर्वांना आपल्या अपयशाचे परिणाम भोगावे लागतात, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महासभेला संबोधित करत होते.
US President #JoeBiden speaking at the #UNGA, said that “we are not seeking a new Cold War or a world divided”.
He also said that countries must now address #ClimateChange, prepare for the next pandemic, which he predicts will occur. https://t.co/OnyJ03lbyN
— WION (@WIONews) September 21, 2021
बायडेन पुढे म्हणाले की, आम्हाला आतंकवादाचे दंश ठाऊक आहेत. आमच्याविरुद्ध जे आतंकवादी कृत्ये करतील, त्यांचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका असेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.