प्लास्टिकमिश्रित तांदूळ खाल्ल्याने मुलाला त्रास !
|
सातारा, २२ सप्टेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यातील अंगणवाडीमध्ये फायबर प्लास्टिकमिश्रित तांदूळ खाल्ल्यामुळे एका मुलाला त्रास झाला आहे. येथील सूज्ञ नागरिकांनी या घटनेचा छडा लावत अंगणवाडीमध्ये वाटप करण्यात आलेला प्लास्टिकमिश्रित तांदूळ शोधून काढला आहे.
याविषयी पालक आणि सूज्ञ ग्रामस्थ यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करत ‘एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजने’ अंतर्गत अंगणवाडीतील मुले आणि गरोदर माता यांना पुरवल्या जाणार्या निकृष्ट अन्नधान्य पुरवठ्यामधील काळाबाजार उघडकीस आणला आहे. २ दिवसांपूर्वी इंदिरानगर येथील एका मुलाने तांदूळ आणि डाळ खाल्ल्यामुळे त्याला त्रास झाला होता. तांदुळासह डाळ, मीठ आणि मिरची पूड आदी साहित्यही अत्यंत निकृष्ट प्रतीचे होते. संबंधित पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी पालक आणि सूज्ञ ग्रामस्थ यांनी केली आहे.