सेवेची तळमळ असणार्या, दुसर्याचा विचार करणार्या आणि प्रेमभाव असलेल्या सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुरेखा यादव (वय ६५ वर्षे) !
सौ. लतिका पैलवान
१. सेवेची तळमळ
अ. ‘सौ. सुरेखा यादवकाकूंची शारीरिक स्थिती पुष्कळ नाजूक आहे, तरी त्या सतत सेवा करतात.
आ. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवारच्या १५ अंकांचे वितरण करतात. त्यासाठी त्यांना दूरवर पायी जाऊन वितरण करावे लागते.
इ. त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, तरी त्या प्रत्येक वेळी ४० रुपये व्यय करून भावसत्संग, स्वभावदोष निर्मूलन सत्संग आणि अन्य सत्संग यांना न चुकता जातात.’
२. व्यष्टीची तळमळ
‘काकू व्यष्टीचे प्रयत्न तळमळीने करतात.
३. दुसर्याचा विचार
नातेवाइकांकडे काही कार्यक्रम असेल, तर काकू त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने, देवतांची चित्रे किंवा ग्रंथ भेट म्हणून देतात. तेव्हा ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, असा विचार न करता ‘त्यांना चैतन्याचा लाभ व्हावा’, असा काकूंचा भाव असतो.
४. आनंदी
त्यांना सेवेसाठी घरातून विरोध आहे, तरीही त्या परिस्थिती स्वीकारून आनंदी असतात. त्यांचे त्याविषयी कोणतेही गार्हाणे नसते.
५. प्रेमभाव
अ. काकू सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोलतात. त्या एखादा साधक रुग्णाईत असेल, तर त्यांना प्रेमाने भेटायला जातात आणि जातांना त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन जातात.
आ. त्या घरी आलेल्या प्रत्येकाला खाऊ दिल्याविना जाऊ देत नाहीत. मी चहा घेत नाही, तर त्या मला त्यांच्या घरी गेल्यावर दूध देतात.’ (२३.२.२०२०)
श्रीमती जयश्री जावळकोटी
सेवेची तळमळ : ‘काकूंनी त्यांच्या पुष्कळ नातेवाइकांना ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार केले आहे.’ (२३.२.२०२०)