स्वभावदोष प्रयत्नपूर्वक घालवायला हवेत !

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

काय करायला हवे, ते सत्संगात सांगितले जाते; पण एकीकडे सत्संगाला जायचे आणि दुसरीकडे राग, द्वेष, लोभ, ममता इत्यादींना कवटाळून बसायचे ! अशाने आयुष्यभर सत्संगात जात राहिले, तरी काय होणार ? नुसते सत्संग ऐकून राग, लोभादी स्वभावदोष जाणार नाहीत. त्यांना स्वतःहून, स्वतःच्या प्रयत्नांनी घालवायला हवेत.

– अनंत आठवले (२२.११.२०२०)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)