२१ बँकांमधील कोट्यवधी ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा भरपाई मिळणार !

मुंबई – विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे २१ बँकांमधील कोट्यवधी ठेवीदारांना २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवरील विमा भरपाई मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी बँकांमधील ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असल्यासंबंधी नुकताच खुलासा केला होता.

तसेच अडचणीत असलेल्या बँकांच्या ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन’ अंतर्गत (डी.आय.सी.जी.सी.) ठेवीदारांना ५ लाखापर्यंतची रक्कम ९० दिवसांत मिळण्याची हमी दिली होती. त्यानुसार बँकांनी ठेवीवरील विमा भरपाईची प्रक्रिया चालू करण्याचे निर्देश ‘डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशन’कडून देण्यात आले आहेत. यानुसार ४५ दिवसांत बँकांना विमा दाव्यासाठी अर्ज करायचा आहे. तसेच याविषयीची छाननी आणि दावा प्रक्रिया २९ नोव्हेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात ‘डी.आय.सी.जी.सी.’कडून देण्यात आल्या आहेत.