तज्ञ समितीकडून सूचना आल्यानंतर शाळांविषयी निर्णय घेणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – तज्ञांच्या समितीकडून सूचना आल्यानंतर गोव्यात शाळा पुन्हा चालू करण्याविषयी शासन निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात पर्यटन चालू करण्यासमवेतच चार्टर्ड विमानसेवा चालू करण्यासंबंधी आम्ही केंद्रशासनाला पत्र पाठवले आहे आणि केंद्रशासनाच्या अनुमतीची वाट पहात आहोत.’’