यवतमाळ येथे दोन आधुनिक वैद्यांच्या वादात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू !
यवतमाळ, २२ सप्टेंबर (वार्ता.) – येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १६ वर्षीय रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. वैद्यकीय विभाग आणि शस्त्रकर्म विभागातील दोन आधुनिक वैद्यांमध्ये वाद झाला. त्यात ते ‘हा रुग्ण माझ्या विभागातील नाही’, असे म्हणत होते. (आधुनिक वैद्यांमध्ये अशा स्वरूपाचा वाद होणे बालिशपणाचे ! – संपादक) हा वाद चालू असतांनाच तो मुलगा मृत झाला. त्यामुळे नातेवाइकांनी ‘आधुनिक वैद्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, त्याविना आम्ही मृतावर अंत्यसंस्कार करणार नाही’, असा पवित्रा घेतला. अधिष्ठाता आधुनिक वैद्य कांबळे यांनी समिती नेमून चौकशीचे आश्वासन दिल्यावर नातेवाइकांनी माघार घेतली.