भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल
मुसलमानांचा प्रजनन दर २.६, तर हिंदूंचा २.१ !
|
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय मुसलमानाचा प्रजनन दर अन्य धर्मियांच्या तुलनेत अधिक आहे. मुसलमानांमध्ये वर्ष १९९२ मध्ये प्रति महिला प्रजनन दर हा ४.४ इतका होता, तर वर्ष २०१५ मध्ये यामध्ये घट झाली असून तो २.६ इतका झाला आहे. तरीही भारतातील मोठ्या धार्मिक समूहामध्ये मुसलमानांचा प्रजनन दर सर्वाधिकच आहे. त्याच वेळी भारतातील प्रत्येक धार्मिक समुदायातील प्रजनन दर न्यून झाला आहे, असे अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर या दिवशी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Key findings about the religious composition of India https://t.co/lFbsWca9lg pic.twitter.com/PdKpSoFBfI
— Pew Research Center (@pewresearch) September 22, 2021
या अहवालानुसार
१. मुसलमान आणि हिंदु धर्मियांमधील प्रजनन दराचे अंतरही अल्प झाले आहे. हिंदूंमध्ये २.१ इतका प्रजनन दर आहे. वर्ष १९९२ हिंदूंमध्ये ३.३ इतका प्रजनन दर होता.
२. जैन धर्मियांमध्ये सर्वांत अल्प म्हणजे १.२ इतका प्रजनन दर आहे.
मुसलमानांच्या लोकसंख्येत ५ पटींनी वाढ !
वर्ष १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के होती. वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये ती ७९.८ टक्के असल्याचे म्हणजे ५ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले. वर्ष १९५१ ते २०११ या काळात मुसलमानांची लोकसंख्या ५ पटींनी वाढली आहे. त्या वेळी ही लोकसंख्या ३ कोटी ५० लाख होती, ती वर्ष २०११ मध्ये १७ कोटी २० लाख इतकी झाली. वर्ष २००१ ते २०११ या १० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या १३.४ टक्के झाली. वर्ष २०२१ मध्ये त्यात आणखी वाढ झाली आहे. याची आकडेवारी जनगणनेनंतरच समोर येईल.