अनिल परब यांच्याकडून सोमय्यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा प्रविष्ट !
मुंबई – परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट केला आहे. ‘माझ्यावरील आरोप मागे घेऊन क्षमा मागावी, अन्यथा १०० कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट करू’, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्या यांना पाठवली होती; मात्र ७२ घंट्यांनंतरही सोमय्या यांनी क्षमा न मागितल्याने अखेर हा दावा प्रविष्ट करण्यात आला आहे. अनिल परब यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.