सनातन संस्थेचे ग्रंथ सर्व स्तरांवरील जिज्ञासूंसाठी उपयुक्त !
‘सनातन संस्थेच्या ग्रंथांमध्ये अध्यात्म, धर्म, विविध साधनामार्ग, देवता यांसारख्या विविध विषयांवरील ज्ञान अंतर्भूत आहे. हे ज्ञान सध्याच्या वैज्ञानिक परिभाषेत दिलेले असल्यामुळे बुद्धीने अध्यात्म जाणून घेणार्या जिज्ञासूंना आवश्यक असे आहे. यासह यातील काही ज्ञान हे या भूतलावर आजवर कोठेही उपलब्ध नसणारे दैवी ज्ञान आहे. त्यामुळे हे ज्ञान त्या विषयातील जाणकारांनाही उपयोगी आहे. अशा प्रकारे सनातनचे ग्रंथ हे जिज्ञासूपासून जाणकारांपर्यंत सर्वांना उपयुक्त आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.८.२०२१)