सांगली येथील स्थानिक केबल वाहिनीवर पितृपक्षानिमित्त आजपासून सनातन संस्थेच्या विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !
सांगली – ‘सांगली मिडिया कम्युनिकेशन’च्या (‘सी न्यूज’च्या) ‘भक्ती’ वाहिनीच्या १०९ क्रमांकाच्या वाहिनीवर पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या ‘पितृपक्ष आणि महालय श्राद्धविधी’, या विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. १४ भागांच्या या मालिकेचे २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.