समाधी आणि आत्मज्ञान
।। श्रीकृष्णाय नमः ।।
योगशास्त्रातील समाधी, ही एक अवस्था आहे, जी अस्थायी आहे. आत्मज्ञान ही अवस्था नसून आत्मस्वरूप आहे.
‘सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म ।’ – तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मानन्दवल्ली, अनुवाक १, मन्त्र १
अर्थ – ‘वास्तविक अस्तित्व, ज्ञान आणि अनंतत्व हे आत्म्याचे, ‘ब्रह्म’चे स्वरूप आहे’; म्हणून ते स्थायी आहे.
– अनंत आठवले (२५.१०.२०२०)
(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)