आधुनिक वैद्यांनी ‘हलाल जिहाद’कडे देशावरील आर्थिक संकट म्हणून पहावे ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती
नवेपारगाव (जिल्हा कोल्हापूर), २१ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या ‘हलाल’ प्रमाणपत्र नावाची नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून मिळणारा पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. असे होऊ नये, यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका. ‘हलाल जिहाद’कडे आधुनिक वैद्यांनी देशावरील आर्थिक संकट म्हणून पहावे आणि या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने जागृत होऊन होऊन स्वतःचे योगदान द्यायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांसाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या मार्गदर्शनाचा लाभ २५ जणांनी घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही विविध उदाहरणे देऊन ‘हलाल जिहाद’ भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारे कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, ते स्पष्ट केले.
विशेष – ‘प्रोजेक्टर’ वापरून विषयाची माहिती दिल्याने अनेकांना तो समजणे सोपे झाले.