पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन !
पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील गावांत जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन केले होते. याअंतर्गत ग्रामीण भागात १ सहस्र २४ टन कचर्याची विल्हेवाट लावण्यात आली. मोहिमेत जिल्ह्यातील आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी सरपंच, उपसरपंच सहभागी झाले. एका दिवसात इतक्या कचर्याची विल्हेवाट लावण्याचा विक्रम जिल्हा परिषदेच्या नावावर नोंदला गेला आहे.