बांगलादेशातील मंदिरांवर आक्रमण करणार्या हिफाजत-ए-इस्लामच्या धर्मांध नेत्याला ६ मासांनी अटक !
हिंदु मंदिरांवर आक्रमणे करणार्या, तसेच दंगली घडवणार्या धर्मांधांना ६ मासांनी अटक करणारे बांगलादेशातील पोलीस ! यावरून तेथील हिंदूंना न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको ! – संपादक
ढाका – बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने २६ मार्च या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशमध्ये गेले होते. त्या वेळी धर्मांधांनी अनेक हिंदु मंदिरांवर आक्रमणे केली होती. यात हिफाजत-ए-इस्लामी या संघटनेचा हात होता. या वेळी झालेल्या हिंसाचारात शेकडो लोक ठार झाले होते. याप्रकरणी हिफाजत-ए-इस्लामचा नेता रिजवान रफीक याला १७ सप्टेंबर या दिवशी अटक करण्यात आली.
हिन्दू मंदिरों पर हमले करने वाला रिजवान रफीक गिरफ्तार, जला दी थी प्रतिमाएँ: PM मोदी के दौरे को लेकर की थी हिंसा#Bangladeshhttps://t.co/cau6JrlVUu
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 19, 2021
या हिंसाचाराच्या वेळी मगुरा जिल्ह्यातील महंमदपूरमध्ये असलेल्या ४०० वर्षे प्राचीन अष्टग्राम महास्मशान येथील मंदिर आणि राधागोविंद आश्रम यांची तोडफोड करून त्यांना आग लावण्यात आली होती. यात रथ आणि देवतांच्या मूर्ती जळून नष्ट झाल्या होत्या.