भारतात जेथे मंदिरे पाडून मशिदी उभारण्यात आल्या, तेथे भाजप पुन्हा मंदिरे उभारणार ! – भाजपचे आमदार संगीत सोम यांचा दावा
मेरठ (उत्तरप्रदेश) – भारतात ज्या ठिकाणी मशिदी उभारण्यासाठी मंदिरे पाडली गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी भाजपकडून मंदिरे उभारली जातील, असे विधान राज्यातील सरदाना येथील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे. राज्यातील भाजप सरकारला साडेचार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे. #UPElections2022 #BJP https://t.co/oRLgNWROQi
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2021
सोम पुढे म्हणाले की,
१. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे ‘हंगामी हिंदू’ (कधी कधी हिंदू असल्याचे भासवणारे) आहेत. त्यांच्यामध्ये धाडस असेल, तर त्यांनी ‘मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून तिथे मशीद उभारली गेली’, असे बोलून दाखवावे.
२. अखिलेश यादव यांच्यासारखे लोक म्हणत आहेत की, ते विश्वकर्मा यांचे मंदिर बांधतील. हे तेच लोक आहेत ज्यांच्या वडिलांनी (मुलायमसिंह यादव यांनी) रामभक्तांवर गोळीबार केला होता आणि काशीमध्ये साधूंवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता. ही मंडळी आता हात जोडून क्षमा मागत आहेत; पण लोक त्यांना क्षमा करणार नाहीत.