परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या कठीण अथवा अप्रचलित शब्दांचे अर्थ न लिहिण्याच्या संदर्भातील चुका
‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० मे २०२१ पासून दैनिकातील अनेक चुका लक्षात आणून देण्यास प्रारंभ केला.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/511996.html
परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः अध्यात्मातील अधिकारपदावर आहेत. लौकिकदृष्ट्याही ते अत्यंत उच्चशिक्षित आहेत. असे असले, तरी त्यांचे लिखाण, मार्गदर्शन यांत कुठेच बोजड शब्द, क्लिष्ट किंवा समजण्यास कठीण रूपके नसतात. ‘सर्वांना सहज समजेल, अशी भाषाशैली असावी’, असे मार्गदर्शन ते आम्हाला नेहमीच करतात. ‘परकीय शब्द, तांत्रिक शब्द यांचा अर्थ दिल्यास वाचकांना लिखाण सहजतेने समजते’, असा त्यांचा यामागील उद्देश असतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेकदा हे सूत्र सांगूनही वार्ता आणि लेख यांमध्ये काही संज्ञा, शब्द यांचे अर्थ न लिहिण्याची चूक आमच्याकडून वारंवार होते. काही वेळा अर्थ दिला जातो; पण त्यामुळे वाक्याची सलगता तुटते. अशा वेळी तारतम्याने वाक्याच्या शेवटी अर्थ देणे अपेक्षित असते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या लिखाणातील अशा चुकांची काही उदाहरणे येथे देत आहोत.
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके. (१८.९.२०२१)