‘ॲमेझॉन’कडून ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी !
नवी देहली – ऑनलाईन विक्री करणारे आस्थापन ‘ॲमेझॉन’ने ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी घातली आहे. त्यांच्याकडून ॲमेझॉनच्या धोरणांचे उल्लंघन करण्यात येत होते, असे ॲमेझॉनकडून सांगण्यात आले आहे.
.@amazon has banned 600 #Chinese brands from its e-commerce platform permanently, as per a report.https://t.co/AjYtOuZOwY
— Hindustan Times Tech (@HTTech) September 20, 2021
ॲमेझॉनने स्पष्ट केले आहे की, ही चीनला ‘लक्ष्य’ करण्याची मोहीम नसून ती एक जागतिक मोहीम आहे. आम्ही चुकीची कृत्ये करणार्यांवर कारवाई करणे चालूच ठेवू. आम्हाला निश्चिती आहे की, आम्ही जी पावले उचलली आहेत, ती आमच्या ग्राहकांच्या हितासाठीच आहेत.