आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’ निवडणूक लढवणार
पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’ने ‘मायनिंग डिपेंडंट फोरमच्या’ फलकाखाली निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे, अशी माहिती गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी २० डिसेंबरला पत्रकारांना दिली.ते म्हणाले, ‘‘गोव्यात असलेल्या २१ मतदारसंघांत खाणीवर अवलंबून असणार्या लोकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा पराभव करण्यासाठी या मतदारसंघांमध्ये आमचा उमदेवार उभा करणार किंवा इतर समविचारी पक्षांशी युती करणार, असा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांनंतर आम्ही आमचे याविषयीचे धोरण घोषित करू. गोव्यात भाजपने सर्वसाधारण लोकांसाठी काहीही न केल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये असंतोष आहे.’’ त्यांनी आप, रिव्हॉल्युशनरी गोवन्स आणि काँग्रेस या पक्षांशी युती करण्यासंबंधीचा उल्लेख केला.