चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री !
चंडीगड – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्वीट करून काँग्रेसचे नेते चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील, असे घोषित केले आहे. दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीतसिंह चन्नी यांच्या नावावर काँग्रेस प्रमुखांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली.