प्रशासनाला अन्यत्रची गर्दी चालते; मात्र श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी चालत नाही !
‘हिंदु समाज सहिष्णू आहे. धर्मपरायण आहे; म्हणून हिंदूंच्या धर्माचरणावर निर्बंध आणले तरी चालतील’, या भ्रमात शासनाने राहू नये. राज्यातील विविध पक्षांच्या सभा, तसेच कार्यक्रम यांसाठी झालेली गर्दी चालते; बाजार आणि ‘मॉल’मध्ये (दैनंदिन जीवनात लागणार्या सर्व वस्तू एके ठिकाणी मिळण्याचे ठिकाण) झालेली गर्दी चालते; मात्र केवळ श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यात केलेले चालत नाही, हा हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणण्याचाच प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करतो.’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.