पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण पथकाचे संरक्षण करणार्या पोलिसांवर गोळीबार !
एक पोलीस ठार
पेशावर (पाकिस्तान) – कोहट जिल्ह्यातील धल बेजादी भागामध्ये पोलिओ लसीकरण करणार्या पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असणार्या पोलीस पथकातील एका पोलिसाला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केले. आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले होते. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेले नाही. पोलीस आक्रमणकर्त्यांचा शोध घेत आहेत. पाकमध्ये ५ दिवसांची लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचा हा तिसरा दिवस होता. पाकमध्ये यापूर्वीही लसीकरण करणार्यांवर आक्रमण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (पाकमध्ये धर्माच्या नावावर लसीकरण मोहिमेला तेथील जिहादी आतंकवादी संघटनांकडून विरोध केला जातो. तेथील सरकारही याविषयी काही करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)