रामनाथी आश्रमात आल्यानंतर कु. रूपम चौरासिया यांच्यात झालेले पालट !
१. आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करणे : ‘माझा तोंडवळा नेहमी गंभीर असतो. मी आश्रमात आल्यावर साधकांना आनंदी पाहून ‘आश्रमात साधक नेहमी आनंदी कसे रहातात ?’, हे मी साधकांकडून शिकायला पाहिजे’, असा विचार ईश्वराने माझ्या मनात घातला. त्यामुळे मी आनंदी राहू लागले.
२. व्यष्टी साधना चांगली होणे : आश्रमात आल्यानंतर माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले होऊ लागले. येथे मला ‘वैयक्तिक गोष्टी करतांना भावाची जोड देऊन योग्य कृती कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले. ‘चुकांमधून कसे शिकायचे ? इतरांना साहाय्य कसे करायचे ?’, हेही शिकायला मिळाले. मला मनमोकळेपणाने बोलणे जमू लागले.’
– कु. रूपम चौरासिया, समस्तीपूर, बिहार. (२६.१०.२०१८)