हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील ‘स्वरांजली’ दूरचित्रवाहिनीवर गणेशोत्सवाविषयी विशेष मुलाखत प्रसारित !

सौ. राजश्री तिवारी (उजवीकडे) यांची मुलाखत घेतांना कु. वर्षा जेवळे

सोलापूर – गणेशोत्सवानिमित्त येथील ‘स्वरांजली’ दूरचित्रवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची गणेशोत्सवाविषयी विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी घेतली. ही मुलाखत प्रसारित करण्यासाठी ‘स्वरांजली वाहिनी’चे संपादक श्री. दयानंद मामड्याल यांचे विशेष सहकार्य लाभले.

या मुलाखतीमध्ये ‘कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का करावे ?’, ‘गणपतीला लाल फूल आणि दुर्वा का वहातात ?’, ‘शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती कशी असावी ?’, ‘डाव्या आणि उजव्या सोंडेची श्री गणेशमूर्ती यांमध्ये डाव्या सोंडेच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन का केले जाते ?’, ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामागील शास्त्र अन् सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे ?’, यांसारख्या विषयावर चर्चा करण्यात आली.

विशेष

१. या मुलाखतीचा २० लाखांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत गणेशोत्सवाची शास्त्रीय माहिती पोचली.

२. ‘गणेशोत्सवानिमित्त अनेक धार्मिक कृती करण्यात येतात; मात्र त्यामागील शास्त्र या मुलाखतीच्या माध्यमातून समजले’, असे अभिप्राय काही दर्शकांनी कळवले.