स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही आधार देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘देवाने आपल्या जीवनाचे सार्थक केले’, असे सांगणे आणि ‘या जन्मात परात्पर गुरु डॉक्टरांचे कृपाछत्र लाभले’, यातच जीवनाचे सार्थक असल्याचे जाणवणे
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘देवाने आपल्या जीवनाचे सार्थक केले.’’ त्यांचे हे वाक्य आठवल्यावर माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात. ‘साक्षात् भगवंताने माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला असे सांगणे’, यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे’, असे मला वाटले. ‘मला या जन्मात परात्पर गुरु डॉक्टरांचे कृपाछत्र लाभले’, यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.
२. परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून २ वेळा दर्शन होणे
२ अ. रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून दर्शन देऊन ‘सकाळी उठतांना ‘कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग’, असे काहीतरी म्हणा’, असे सांगणे आणि त्यांच्या त्या वाक्याचा समजलेला अर्थ : एप्रिल आणि मे २०२१ मध्ये मी रुग्णाईत होतो. एक दिवस मी सकाळी अर्धजागृत अवस्थेत असतांना मला दिसले, ‘सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर माझ्या कक्षात आले आणि म्हणाले, ‘सकाळी उठतांना ‘कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग’, असे काहीतरी म्हणा.’ त्या वेळी मला त्याचा अर्थ समजला नाही; पण ‘त्यांचे दर्शन झाले’, या आनंदातच मी उठलो. नंतर मी चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘त्या दिवसांत सकाळी उठल्यावर माझ्या मनात ‘मी रुग्णाईत आहे’, हा पहिला विचार असायचा. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना सांगायचे असावे, ‘सकाळी उठल्यावर रुग्णाईत असल्याचा विचार करण्यापेक्षा गुरुकृपायोगानुसार साधनेचा विचार कर. माझे तुझ्याकडे लक्ष आहे.’
२ आ. ‘सनातन प्रभात’मध्ये योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयीच्या सनातनच्या ग्रंथाच्या प्रकाशनाचे वृत्त वाचल्यावर प.पू. दादाजींची आठवण येऊन भावजागृती होणे : याच कालावधीत मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचा ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्याचे वृत्त वाचले. तेव्हा मला योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सत्संगातील आनंदाचे क्षण आठवले. त्या वेळी माझा त्यांच्याप्रतीचा भाव जागृत होऊन मी त्यांना प्रार्थना केली.
२ आ १. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे हातात ग्रंथ घेतलेल्या स्थितीत दर्शन होणे आणि ‘ते योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयीचा ग्रंथ द्यायला आले आहेत’, असे वाटून आनंद होणे : दुसर्या दिवशी सकाळी मी अर्धजागृत अवस्थेत असतांना मला दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टर हसतमुखाने माझ्या कक्षात आले. त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या हातात ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी धरतात, तसा एक ग्रंथ होता. ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्र अस्पष्ट होते.’ त्या वेळी मला अत्यंत आनंद झाला आणि मी त्याच अवस्थेत उठलो. तेव्हा मला वाटले, ‘साक्षात् परात्पर गुरु डॉक्टर मला योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयीचा ग्रंथ द्यायला आले होते.’ ‘मला आनंद मिळावा’, यासाठी कृपाळू परात्पर गुरु डॉक्टर किती करतात !’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
मला स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही आधार देणार्या, माझ्या हृदयात आणि प्रत्येक श्वासात वसलेल्या अन् मला सतत चरणांशी ठेवून आनंद देणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक संत (७.७.२०२१)
|