दाऊदचा हस्तक ठाणे पोलिसांच्या कह्यात !
ठाणे, १९ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे नगर पोलिसांनी मोक्काअन्वये शिक्षा भोगत असलेला दाऊदचा हस्तक तारीक परवीन याचा तळोजा कारागृहातून कह्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तारीक हा मुंबई बाँबस्फोटातील आरोपी आहे, तसेच त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद आहेत.