मिरज शासकीय रुग्णालयातून सातारा येथे स्थानांतरित झालेले प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक यांचे परत मिरज येथे स्थानांतर !
आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यास यश !
सांगली, १९ सप्टेंबर (वार्ता.) – मिरज येथील शासकीय रुग्णालयातून ४९ प्राध्यापक डॉक्टर आणि साहाय्यक प्राध्यापक यांचे सातारा येथे स्थानांतर करण्यात आले होते. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात प्राध्यापक-डॉक्टर या संस्थेमधून गेल्यामुळे रुग्णांची असुविधा झाली होती, तसेच येथील शिक्षणावरही परिणाम होणार होता. त्यामुळे या सर्वांचे मूळ ठिकाणी स्थानांतर होण्यासाठी आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने ही मागणी मान्य करत मिरज शासकीय रुग्णालयातून सातारा येथे स्थानांतरित झालेले सर्व प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक यांचे परत मिरज येथे स्थानांतर केले आहे.