अॅमेझॉन’कडून ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी !
नवी देहली – ऑनलाईन विक्री करणारे आस्थापन ‘अॅमेझॉन’ने ६०० चिनी आस्थापनांवर कायमची बंदी घातली आहे. त्यांच्याकडून अॅमेझॉनच्या धोरणांचे उल्लंघन करण्यात येत होते, असे अॅमेझॉनकडून सांगण्यात आले आहे. अॅमेझॉनने स्पष्ट केले आहे की, ही चीनला ‘लक्ष्य’ करण्याची मोहीम नसून ती एक जागतिक मोहीम आहे. आम्ही चुकीची कृत्ये करणार्यांवर कारवाई करणे चालूच ठेवू. आम्हाला निश्चिती आहे की, आम्ही जी पावले उचलली आहेत ती आमच्या ग्राहकांच्या हितासाठीच आहेत.
ॲमेझॉनचा निर्णय योग्य असल्याचे सांगत याचे स्वागत करण्यात येत आहे.#Amazon #China https://t.co/yCrKoVEWdR
— Lokmat (@MiLOKMAT) September 19, 2021