मिस्टर इंडिया ‘बॉडी बिल्डर’ मनोज पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न !
स्पर्धा जिंकण्यासाठी अभिनेता साहिल खान त्रास देत असल्याचा आरोप !
- धर्मांधांमध्ये खिलाडू वृत्ती नसते, तर ‘स्वतःच्या अस्तित्वासाठी ते दुसर्याचा जीवही सहज घेऊ शकतात’, याचेच हे उदाहरण आहे ! हिंदूंनी ‘धर्मांध खेळाडूंविषयी काय धोरण ठेवायचे ?’, ते ठरवायला हवे !
- सुशांतसिंह रजपूत यालाही चित्रपटसृष्टीतील धर्मांधांनी स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिल्याच्या चर्चा होत्या. यावरून चित्रपटसृष्टीतील धर्मांधांची मानसिकता लक्षात येते !
- ‘असहिष्णु कोण आहेत ?’, ते चित्रपटसृष्टीतील अशा धर्मांधांवरून लक्षात येते !
मुंबई, १७ सप्टेंबर (वार्ता.) – ‘बॉडी बिल्डर’ मनोज पाटील यांनी गोळ्या घेऊन आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. अभिनेता साहिल खान मागील अनेक दिवसांपासून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाटील यांनी याविषयी सामाज माध्यमावर चित्रीकरण प्रसारित करत हे आरोप केले आहेत. ‘त्रास आणि अपकीर्ती यांमुळेच आत्महत्येचे पाऊल उचलत आहे’, असे पाटील यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.
मनोज पाटील ‘मिस्टर ऑलिम्पिया’साठी प्रयत्न करत होते. साहिल खान यालाही या स्पर्धेत उतरायचे होते. साहिल खान ‘मी स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता’, असा आरोप पाटील यांनी केला आहे. साहिल खान सामाजिक माध्यमावर त्यांची अपकीर्ती करत होता. (लोकहो धर्मांधांची वृत्ती जाणा ! एखाद्याला जीवनातून उठवण्यासाठी धर्मांधांची मजल कुठपर्यंत जाते ते पहा ! – संपादक) त्यांच्यामध्ये व्यावसायिक आणि इतर वादही होते. वरील सर्व गोष्टींचा मानसिक त्रास सहन होत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मनोज पाटील यांच्या कुटुंबियांकडून ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.