इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रसार करणार्या लोकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून संपर्क क्रमांक घोषित !
|
नवी देहली – इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेच्या विचारसरणीचा प्रसार करणार्या लोकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ०११-२४३६८८०० संपर्क क्रमांक घोषित केला आहे. या क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १६ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूत एका प्रकरणात एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने अन्य काही जणांच्या साहाय्याने भारतात इस्लामिक स्टेटची स्थापना करण्यासाठी, तसेच भारतासह संपूर्ण विश्वात शरीयत कायदा लागू करण्याचे षड्यंत्र रचले असल्याचे उघड झाले. यापूर्वीही देशात इस्लामिक स्टेटचे समर्थक मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वरील संपर्क क्रमांक घोषित केला आहे.
#NIA creates hotline to clip Islamic State ‘tentacles’ spreading in #India via social media.https://t.co/OC0tBcCIEk
— TIMES NOW (@TimesNow) September 17, 2021