दक्षिण भारतात इस्लामिक स्टेटकडून ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचे षड्यंत्र उघड !
|
|
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्आयए’ने) इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) ‘अल् हिंद’ गटाशी संबंधित शिहाबुद्दीन या आतंकवाद्याच्या विरोधात नुकतेच पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. अन्वेषणात दक्षिण भारतामध्ये ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे समोर आले आहे. ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीप्रमाणे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे की, इसिसच्या आतंकवाद्यांनी दक्षिणेतील कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या माध्यमांतून पोलीस अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्या हत्यांसाठी शस्त्रे अन् स्फोटकेे एकत्र करण्याविषयी षड्यंत्र रचण्यात आले होते.
दक्षिण भारत में ‘इस्लामी खिलाफत’ चाहता था अल-हिंद का आतंकी, हिंदू नेताओं की हत्या की थी साजिश: NIA की चार्जशीट से खुलासाhttps://t.co/dMzXCVlUfE
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 16, 2021
१. विशेष उपनिरीक्षक ए. विल्सन यांच्या हत्येप्रकरणी एन्आयएने जानेवारी २०२१ मध्ये चैन्नई येथील ३९ वर्षीय शिहाबुद्दीन याला अटक केली होती. विल्सन यांना मारण्यासाठी शिहाबुद्दीन आणि त्याच्या सहकार्यांनी बंदूक अन् स्फोटके यांचा वापर केला होता. या हत्येप्रकरणी ६ आरोपींच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.
२. बेंगळुरूच्या गुरप्पनपाल्या येथे रहाणारे महबूब पाशा आणि खाजा मोइदिन यांनी दक्षिण भारतातील मुसलमान युवकांना भरती करून ‘अल्-हिंद’ या इसिसशी संबंधित आतंकवादी गटाचे गठन केले होेते. या युवकांना हिंंदुत्वनिष्ठ नेते आणि पोलीस अधिकारी यांना ठार करण्यासाठी जंगलांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. हत्या केल्यानंतर त्यांना आश्रय घेण्यासाठी विविध राज्यांमधील सुरक्षित ठिकाणांचीही निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील रत्नागिरीचा समावेशही करण्यात आला होता.
४. या प्रकरणात एन्आयएने इसिसशी संबंधित २५ संशयितांना ओळखले आहे. ते अफगाणिस्तानमध्ये असून तेथील सत्तापालटानंतर आता जिहादसाठी भारतियांची ‘ऑनलाईन’ भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जाते.