सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू : २७ नवीन रुग्ण
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २७ नवीन रुग्ण आढळले, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ३८५ झाली आहे. १७ सप्टेंबरला २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ६६६ झाली आहे. सद्य:स्थितीत १ सहस्र २७५ रुग्णांवर उपचार चालू आहेत. यापैकी १५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.