सावंतवाडीत ‘एम्.टी.डी.सी’ने केलेल्या कामांच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती
आज करणार कामांची पहाणी
सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (‘एम्.टी.डी.सी’च्या) वतीने शहरात करण्यात आलेल्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला होता, तसेच याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार या कामांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार राजाराम म्हात्रे आहेत. समिती १८ सप्टेंबरला घटनास्थळी भेट देऊन पहाणी करणार आहे. यापूर्वी या समितीचे सदस्य असलेले जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी बुधावले आणि सावंत, तसेच पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी कलपे यांनी या कामांची पहाणी केली होती.