भाजपच्या आंदोलनानंतर कुडाळ-मालवण रस्त्यावरील खड्डे आजपासून बुजवण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन
कुडाळ – कुडाळ-मालवण मार्गावर शहरातील नाबरवाडी येथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह पादचार्यांनाही त्याचा त्रास होत आहे. याच्या विरोधात शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी १७ सप्टेंबर या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयात जाऊन अधिकार्यांना खडसावले. या वेळी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता बिराडे यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर १८ सप्टेंबरपासून खड्डे बुजवण्यास प्रारंभ करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, राजू बक्षी, नीलेश परब, दीपक सावंत आदी उपस्थित होते.